
कोल्हापूर: शिवाजी महाराजांना अत्यंत निष्ठावान व पराक्रमी सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली. त्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावर्षी तानाजी मालुसरे यांच्या धारातीर्थी पतनाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नरवीर तानाजी मालुसरे स्मारक समिती यांच्यावतीने व कोल्हापुरातील मैत्रेय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त संयोजनाखाली सिंहगड ते उमरठ नरवीर तानाजी मालुसरे पुण्य यात्रा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्य यात्रेचे नेतृत्व दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके हे करणार असून शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर हे सहसंयोजक आहेत. या पुण्ययात्रेचे आयोजन महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून यात देश आणि कोकणातील शेकडो दुर्ग आणि इतिहासप्रेमी संस्था सहभागी होणार आहेत. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी या पुणे यात्रेला प्रारंभ होणार असून १७ फेब्रुवारी रोजी ही पुण्ययात्रा उमरठ येथे प्रस्थान करणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ही पुण्य यात्रा पुढच्या पिढ्यांना प्रेरणास्त्रोत ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राजेश पाटील, यशपाल सुतार, सुचित हिरेमठ, मधुसूदन तांबेकर यांच्यासह मैत्रेय प्रतिष्ठानचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply