
कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात सतत होणारे बदल यामध्ये आजाराचे निदान आणि उपचार यासाठी नवनवीन तपासणी पद्धत, उपचार पद्धती, औषधे निर्माण होत असतात. या नवीन संकल्पना, अत्याधुनिक निदान साधने, नवीन उपचार पद्धतीचे ज्ञान वैद्यकीय व्यावसायिकाला असणे आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित होत आहे. यासाठी येथील तज्ञ डॉक्टर्सना हे नवीन बदल आत्मसात करता यावेत म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील जिल्ह्यातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्यावतीने ‘केएमए-कॉन २०२०’ या एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचे रविवारी १६ फेब्रुवारी २०२० रोजी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, बेलबाग जयप्रभा स्टुडिओ समोर, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी निरनिराळे विषय (थीम) घेऊन गेली अनेक वर्षे या प्रकारच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले जाते. यावर्षी “Relearn and Rejuvenate” या विषयावर या परिषदेत चर्चा होणार असून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून तीनशे तज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या परिषदेचे उद्घाटन १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या परिषदेत डॉ.प्रशांत लाड, डॉ.अभिजीत गणपुले, डॉ.विजय पिलई, डॉ.साईप्रसाद, डॉ.कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ.विलास नाईक, डॉ.मेहता, डॉ.अजित कुलकर्णी, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ.बिपीन विभूते, डॉ.स्नेहवर्धन पांडे, डॉ.शर्वील गाडवे, डॉ.रोहित रंदे, डॉ.दीपक कद्दू, डॉ.अमोल खोत हे विविध विषयांवरील चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती या शिखर परिषदेचे प्रमुख डॉ.सोपान चौगुले व डॉ.देवेंद्र होशिंग यांनी दिली. पत्रकार परिषदेस सचिव डॉ.आशा जाधव, डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ. गीता पिलई,डॉ. ए. बी.पाटील,डॉ. संजय घोटणे,डॉ. अरुण धुमाळे,डॉ. पी. एम.चौगुले आदी उपस्थित होते.
Leave a Reply