
कोल्हापूर : हाडांसाठी भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या संचेती इन्स्टिट्युट फॉर आर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलीटेशन आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट,कोल्हापूर यांच्या तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात 300 हून अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट,कोल्हापूर चे अध्यक्ष अरूण गोयंका यांच्या हस्ते व संचेती हॉस्पिटल चे प्रख्यात सांधेरोपण तज्ञ डॉ कैलास पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही तपासणी डॉ.कैलास पाटील यांच्या सह स्पाईन सर्जन डॉ.सिध्दार्थ अय्यर व डॉ.सिध्दार्थ साबळे आणि डॉ.सागर दवे, यांच्या तर्फे करण्यात आली.या शिबिराच्या आयोजनामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट,कोल्हापूरचे सचिव दिलीप बजाज,सदस्य पुरूषोत्तम जवळ,अशोक अगरवाल,परेश अगरवाल,पुजारी विष्णुप्रसाद दायमा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबिरात ऑर्थोपेडीक्स तपासणी,ऑर्थोपेडीक्स कन्सलटेशन,बीएमडी मशीन टेस्ट आणि सल्ला,फिजिओथेरपी या सेवा सुविधांचा विनामूल्य लाभ सहभागींना मिळाला.तसेच सांधेदुखी,संधिवात,सांधे प्रत्यारोपण,कंबर दुखणे,हाता-पायांना मुंग्या येणे,फ्रोजन शोल्डर,मणक्याचे जुने आजार,डायबेटिक न्युरोपॅथी,सायटिका पेन,लिगामेंट इंज्युरी,टेनिस एल्बो या सर्व आजारांवर मार्गदर्शन करण्यात आले.
Leave a Reply