
कोल्हापूर : रमणमळा येथील 7 वर्षाचा विश्वविक्रमवीर डॉ.केदार विजय साळुंखे हा येत्या 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता “STOP VIOLENCE AGAINAST WOMEN” चा संदेश घेऊन उजळाईवाडी,तावडे हॉटेल, सांगली फाटा,शिरोली, वाठार किणी टोल नाका, परत कसबा बावडामार्गे पोलीस अधीक्षक चौक कोल्हापूर शहर असे पंचेचाळीस किलोमीटरचे अंतर 105 मिनिटांमध्ये पार करून स्वतःच्या नावावर 4 विश्वविक्रम नोंदविणार आहे त्याच्या या विक्रमाची नोंद चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड (ग्लोबल)यामध्ये होणार आहे .कै. अनंतराव गोविंदराव कोरगावकर सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अमोल कोरगावकर यांनी व आई सौ. स्वाती गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यामध्ये त्याला फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन,फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन असे 4 विक्रम त्याच्या नावावर नोंद होणार आहेत.यामध्ये फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन ही 10.5 किलोमीटर अंतर 22 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करायचे आहे.फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन ही 21.1 किलोमीटरचे अंतर 47.30 सेकंदात पूर्ण करायचे आहे.तर फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन मधील 42.195 किलोमीटर अंतर हे 105 मिनिटात पूर्ण करायचे आहे.तर फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन ही 10 मिनिटात पूर्ण करायची आहे. याचा मार्गग उजळाईवाडी येथून सकाळी 7 वाजता सुरु होणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती गांधीनगर ए.पी.आय दीपक भांडवलकर यांच्या हस्ते या विक्रमाची सुरुवात होणार आहे.हा विक्रम तावडे हॉटेल, सांगली फाटा, टोप, वाठार, किनी टोल नाका परत टोप, शिये फाटा, कसबा बावडामार्गे पोलीस अधीक्षक चौक कोल्हापूर येथे समाप्त होणार आहे.या संपूर्ण स्पर्धेचे अबझर्वर हे मनमोहन रावत हे आहेत. सकाळी 9 वाजता त्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे सोनाली नावांगुळ ,उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,महापौर निलोफर आजरेकर,ग्लोबल रिचर्स अँड रेकॉर्ड सेंटर व मातोश्री वृद्धश्रम च्या सौ.वैशाली राजशेखर,प्रिंसिपल स्नेहल नार्वेकर,आंतरराष्ट्रीय स्केटर अनिकेत चीण्डर आदी स्वागत पर कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत.त्याला कै. अनंतराव गोविंदराव कोरगावकर सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अमोल कोरगावकर कोल्हापूर, न्यू रेसर सायकलिंग क्लब,विगब्योर हाय यांचे मार्गदर्शन मिळाले आई स्वाती गायकवाड साळुंखे व वडील विजय साळुंखे यांचे सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply