
कोल्हापूर : मेक इन इंडिया हा उद्देश साकरण्यासाठी इंडिया वुड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील सर्वात मोठ्या फर्निचर क्षेत्रातील सर्वात मोठ प्रदर्शन असलेल्या इंडियावुडच हे 11 वे वर्ष आहे. या प्रदर्शनाच आयोजन न्युरेमबर्ग मेसे करीत असून, 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीत बेंगळुरूमधील बेंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग आणि लाकूडकाम उद्योगाला ’मेक इन इंडिया’ व्हिजनसह या क्षेत्रामधील सर्वात मोठे उत्पादन केंद्र म्हणून भारताला स्थापित करणे हे उद्दीष्ट आहे.फर्निचर उत्पादन इंडस्ट्री साठी लागणारी यंत्रसामग्री, कच्चे साहित्य, पॅनेल्स, हार्डवेअर, आणि फिटिंग्जचे प्रदर्शन मांडण्या्त येणार आहे. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Leave a Reply