
कोल्हापूर : “भारताची भुमी ही कौशल्य आणि सुपीक मेंदू तयार करण्याची भुमी आहे. येथील तरुणाई प्रचंड उर्जित असून कुशाग्र बुध्दीमता असलेली आहे त्यामुळे येत्या काळात भारत स्वावलंबी तर बनावाच पण त्यापेक्षाही संपूर्ण जगाने भारताकडून तंत्रज्ञान व उत्पादने घ्यावीत, आणि हे तुमच्या म्हणजे तरुण पिढीच्याच हातात आहे”, असे मत उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. रामजी प्रसाद, आराहस विद्यापीठ, हरनिंग डेन्मार्क यांनी व्यक्त केले. केआयटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये पायोनियर 2020 या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मानीय उपस्थिती म्हणून श्री. सत्यनारायण पत्री, कार्यकारी संचालक, इसप्लींग प्रा.लि. पुणे हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी केआयटीचे चेअरमन भरत पाटील होते.रामजी यांनी त्यांच्या भाषणात जगातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलि-कम्युनिकेशन क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा तर घेतलाच आणि या क्षेत्रातील आगामी संधी आणि संशोधन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आराहस विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर टेल इन्फ्रास्ट्रक्चरल ग्लोबल कॅप्सुल अर्थात सीजीसी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी त्यांच्या विनोंदी शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर श्री. सत्यनारायण पत्री यांनी त्यांच्या प्रेरणादायी मनोगतामध्ये विद्याथ्र्यांना उद्योग क्षेत्रात आवश्यक असणारी यशसुत्री सांगितली. त्यांच्या आयुष्यातील अनुभव व्यक्त करताना त्यांनी संयमाला महत्व असल्याचे अधोरेखित केले. स्वत:चे ध्येय ठरवा त्याच्यासाठीचा मार्ग निश्चित करा, तुमच्या शिक्षकांचा आणि संस्थेचा आदर करा यामुळे यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगता येईल असे ते म्हणाले. नवीन कंपनी सुरु करीत असताना सुरुवातीला समस्या जरुर येतील पण निश्चित नियोजन आणि दृढनिश्चय याने सुरुवातीचा कठीण काळ गेल्यावर तुम्हाला जगभरातून मागणी येईल असे प्रतिपादन श्री. सत्यनारायण पत्री यांनी केले.केआयटीचे चेअरमन भरत पाटील अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन केआयटीला जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख बनविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले व वेगवेगळया स्पर्धेतील सहभाग हीच यशाची चावी आहे असे सांगून सहभागी विद्याथ्र्यांचे मनोबल वाढविले.पायोनियरमध्ये संचालक डॉ. व्ही. व्ही.कार्जिन्नी यांनी स्वागत केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रणजीत पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सचिव श्री. दिपक चौगुले, केआयटीचे मा. विश्वस्त साजिद हुदली व विश्वस्त दिलीप जोशी व विद्यार्थी संचालक अक्षय थोरवत, प्रा. अभिजीत पाटील व प्रसार माध्यम समन्वयक म्हणून प्रा. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. आयएसटीई चॅप्टर विद्यार्थी प्रमुख करण पाटील याने आभार मानले तर अरुंधती पाटील व मरियम शेख यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a Reply