
कोल्हापूर : रविवारी ९ फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर, गांधीनगर-गुजरात, मुंबई आणि कोल्हापूर येथे झालेल्या ट्रायथलाँन आणि हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून यशस्वी कामगिरी केली. २३ जणांनी प्रथम ३ मध्ये क्रमांक मिळविले आहेत.अशी माहिती अरहता कोच आशिष रवळु यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टायगरमॅन ट्रायथलाँन ही स्पर्धा 3 किमी स्वीमिंग, १२० किमी सायकलींग, २५ किमी रनिंग या अंतरामध्ये पार पडली.यामध्ये कोल्हापूरच्या ८ जणांनी सहभाग नोंदवून ६ जणांनी प्रथम ३ मध्ये क्रमांक पटकावला. यामध्ये पंकजने ६:३५ तासात रेस पूर्ण करून फास्टेस्ट खेळाडू ठरण्याचा मान मिळविला.त्याबरोबरच श्रेणीक पाटील,संजय सुर्यवंशी,मूकेश टोटला व नीलांबरी जगताप यांनी अनुक्रमे २रा, ३रा असे त्यांच्या वयोगटात क्रमांक पटकाविले. व त्यांच्या बरोबरील अतूल पाटील, भरत दिओरा आणि स्वप्निल माने यांनी देखील स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण केली.हे सर्वजन येत्या काळात आयर्नमॅन कोपेनहेगन, गोवा, फीलिपीन्स, डेक्कन क्लीफहँगर अशा स्पर्धां साठी सराव करत आहेत. प्रामुख्याने यात महिलांचा सहभाग व कामगिरी पुरुषांच्या बरोबरीची ठरली.हे सर्वजण एकत्र ट्रेनींग घेतात व टिम अरहता चे मेंबर्स आहेत. पंकज रवळु हा स्वतः ट्रायथलॉन खेळाडू असुन त्याने आयर्नमॅन सूबीक बे, कोल्हापूर ट्रायथलाँन, गोवा आर्यनमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत व तो आयर्नमॅन युनिर्वसिटीचे र्सटीफाइड कोच असुन १००+ लोकांना कोल्हापूर,इचलकरंजी, सातारा, फलटन, बारामती, पुणे, मुंबई, हुबळी, बेळगाव आदी ठिकाणी इंटरनॅशनल ऑनलाइन प्रशिक्षण देत आहेत. पत्रकार परिषदेला सुप्रिया निंबाळकर,पल्लवी मुग, नीलांबरी जगताप, पंकज रवळू, संजय सूर्यवंशी ,मुकेश टोटला,श्रेणीक पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply