
कोल्हापूर : पोटविकार क्षेत्रातील जिल्ह्यातील नामांकित आणि निष्णात शल्यविशारद अशी ओळख निर्माण केलेल्या डॉ.एम.एम.सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३७ वर्षे कार्यरत असलेले गणेश हॉस्पिटल येत्या ३० जानेवारीपासून ६० बेडची सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्वरुपात रुग्णसेवेचे नवे आरोग्य दालन सुरु करत आहे.अशी माहिती पोटविकार तज्ञ डॉ.एम.एम.सरनाईक आणि अस्थिविकार तज्ञ डॉ.कपिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या नव्या हॉस्पिटल विभागात पोटविकार,मुत्राविभाग आणि अस्थी रोगावरील अत्याधुनिक उपचार सुविधा देणाऱ्या यंत्रसामग्रीसह आधुनिक उपचार पद्धती रुग्णांना उपलब्ध होणार आहे.याचे उद्घाटन येत्या ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता करवीर संस्थानचे श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.अशोक देठे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
१९७९ साली या हॉस्पिटलच्या रुग्णसेवेचा प्रारंभ झाला. ३७ वर्षाच्या आरोग्य सेवेत हजारो रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत. सर्व स्तरातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात.खर्चिक उपचार असल्याने काही रुग्णांना असे उपचार परवडत नसल्याने हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना कक्ष सुरु करण्यात आला.याचा लाभ हजारो गरीब आणि गरजू रुग्णांनी घेतला आहे.
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.कॅन्सर,पोटविकार,मूत्रविकार अस्थिविकार यावरील उपचार मोफत देण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा मानस आहे.अत्याधुनिक एच.डी.कॅमेरा,दुर्बीण,रेकॉर्डर अशा अत्युच्च दर्जाची यंत्रसामग्री परिसरात कोठेही नाही.यामुळे कमी वेळेत योग्य उपचारांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे.अर्थोस्कोपी युनिटमध्ये गुडग्याची शस्त्रक्रिया करता येणार आहे.लिथोट्रेप्सी मशिन,सी-आर्म युनिट यामुळे नवीन तंत्रज्ञानचा वापर करणे शक्य झाले आहे.असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला डॉ.कपिल शिंदे,डॉ.सिद्धार्थ सरनाईक,जनसंपर्क अधिकारी राजेश पारेख तसेच वैद्यकीय अधिकारी.कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply