
कोल्हापूर : भारताच्या 66 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा छ. शाहु स्टेडियम येथे आज सकाळी 9 वाजता पार पडला. जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
उपस्थितांना संबोधित करताना पालक मंत्री म्हणाले सर्वात प्रगल्भ आणि पुरोगामी लोकशाही भारताची आहे. सर्वाना सामान हक्क आहे. शेतकरी आणि सामान्य लोक सुखी तरच महाराष्ट्र सुखी आहे. जलयुक्त शिवार योजना 6 हजार गावात यशस्वी झाली आहे. अजुन 26 हजार गावात ही योजना राबविण्याचा मानस असून दुष्काळावर मात करणार आहे. पाण्याचा जपून वापर करा,शाहू महाराजांच्या जिल्ह्यात मुलगी जन्माला येणे भाग्यशाली आहे. बेटी बचाओ असे आवाहन केले. टोल मुक्त जिल्हा आहेच विमानतळ प्रश्न लवकरच सोडवणार आहे. सिमा वासियांच्या बाजूनेच महाराष्ट्र सरकार कायम राहील असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा परिषद, महापालिका, एस.टी. महामंडळ , यांनी चित्ररथा तुन विविध सामाजिक संदेश दिले. एन. सी.सी, आर.एस.पी, व्हाईट आर्मी, पोलिस परेड,महिला होमगार्ड यांनी मानवंदना दिली. यावेळी क्रीडा आणि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर , पोलिस अधिकारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.विविध शाळा व महाविद्यालये यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
Leave a Reply