
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘स्किल इंडिया’ अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी संस्थेचे उपक्रम उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र राज्यशासनाच्या सहकार्याने ‘यशस्वी’ संस्थेने सुरु केलेली शिका व कमवा योजना आता दिल्ली राज्याशासनानेही ‘यशस्वी’ संस्थेसोबत राबविण्याचे ठरविले आहे.
योजनेमुळे राज्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो आणि सोबत इंजिनिअरिंगचे शासनमान्य शिक्षणही मोफत मिळते ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.असे मत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग,सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूर आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच ‘यशस्वी ग्रुप’मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच कंपनीतील प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन,सामुहीक नृत्य,एकपात्री व पथनाट्य असे कलाप्रकार सादर केले.
कार्यक्रमाला राजाराम कॉलेजचे प्राचार्य व्ही.बी.हेळ्वी, किर्लोस्कर ओईल इंजिनचे प्लांट हेड सुनील माने, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलोजीचे संचालक प्रदीप तुपे यांनी तर आभारप्रदर्शन यशस्वी ग्रुपचे सल्लागार जे.के.सहस्त्रबुद्धे यांनी केले .
यावेळी यशस्वी ग्रुपचे कोल्हापूर विभाग प्रमुख वादिराज इनामदार,सी.एस.कोरे, साजुता बलवंत, संस्थेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्ठ्या संखेने उपस्थित होते.
Leave a Reply