कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातर्फे यु.जी.सी. सॅप डी.आर.एस-३ अंतर्गत दि. २९ व ३० जानेवारी रोजी मानव्यशास्त्र सभागृहामध्ये ‘भारतीय समाज आणि पर्यावरण विषयक प्रश्न’ या मुख्य विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन दि. २९ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता प्रा. डॉ. एम. एन. पाणिनी, एम. वाय. आर. ए. स्कूल ऑफ बिजनेस, म्हैसुरु यांच्या हस्ते होणार असून ते ‘द पॅरिस ॲग्रीमेंट ऑन क्लायमॅट चेंज ॲन्ड इट्स इंम्पिकेशन्स फॉर इंडिया’ या विषयावर बीजभाषण देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे असतील.
चर्चासत्रात भारतातील विविध राज्यांतील विद्यापीठांमधील संशोधक सहभागी होणार आहेत. यामध्ये नामवंत प्राध्यापक डॉ. एस.सी. राजोरा (राजस्थान), डॉ. पी.जी. जोगदंड (मुंबई), डॉ. विद्या जोशी (पुणे), डॉ. आर. राजशेखर (कर्नाटक), डॉ. देवाप्रसाद चटर्जी (कोलकाता), डॉ. श्रीनिवास सज्जा (हैद्राबाद), डॉ. शशी मिश्रा (मुंबई,) डॉ. आशा पाटील (मुंबई), डॉ. मनिषा राव (मुंबई), डॉ. बी. एन. केंद्रे (मुंबई), डॉ. अमर ढेरे (मुंबई), डॉ. सी.पी.मनोहर (कर्नाटक), डॉ. जे. बी. अंबेकर (कर्नाटक), प्रा. डी. श्रीकांत (कर्नाटक) आदी प्राध्यापक, संशोधक आणि विदयार्थी यांचे एकूण ६० शोधनिबंध सादर होणार असल्याचे चर्चासत्राचे संचालक प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी सांगितले. या चर्चासत्राचा विद्यापीठ, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
Leave a Reply