
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये अन्न धान्य, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकचा गॅस यांचा पुरेसासाठा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा हा सुरळीत राहणार आहे. कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. प्रत्येक पेट्रोल पंपावर पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याबाबत आणि पेट्रोल पंप सुरु राहणार असल्याबाबत फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. वर्षभर पुरेल एवढा अन्न धान्याचा साठा कोल्हापूरमध्ये असल्याचे व्यापारी असोसिएशनने सांगितल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी यावेळी दिली.
Leave a Reply