
कोल्हापूर: काही दिवसांपासून कोल्हापूर विमानतळ हे कार्गो हब म्हणून विकसित व्हावे, तिथे एअर बस ३२० सारखी विमाने उतरू शकतील असे अत्याधुनिक काम व्हावे, कोल्हापूर ते गोवा, पुणे, शिर्डी आणि अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू करण्यात यावी, यासाठी माझा सतत पाठपुरावा चालू होता. आज केंद्रीय हवाई मंत्री हरदीप एस.पुरी यांनी पत्राद्वारे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पुर्तता येत्या डिसेंबर २०२०पर्यंत करण्यात येईल असे पत्राद्वारे कळवले आहे.
तसेच कोल्हापूर ते गोवा, पुणे, शिर्डी आणि अहमदाबाद अश्या फेऱ्या सुरू झाल्या पाहिजेत या मागणीला सुद्धा संबंधित विभागाकडे पाठवले आहे, ते सुद्धा विचाराधीन आहे असे सांगितले.
कोल्हापूरकरांच्या मागणीला मंत्री महोदयांनी प्राथमिकता दिली. कोल्हापूर चे विमानतळ हे केवळ प्रवासी वाहतुकी च्या दृष्टीने न बघता औद्योगिक, व्यापारी आणि शेती उत्पादनांचे वाहतूक केंद्र बनावे अशी माझी मागणी होती. तिला सुद्धा त्यांनी मान्य केले.
Leave a Reply