
कोल्हापूर: तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुरातील ‘ते’ २१ बांधव दिल्ली मध्येच आहेत.ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत .लॉक डाउन मागे घेतल्यानंतरच हे बांधव कोल्हापुरात येणार आहेत.यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही .हे सर्वजण आरोग्यदृष्टया तंदुरुस्त असल्याचे स्पष्टीकरण मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी भाई आजरेकर यानी दिले आहे. काही वृत्तवाहिन्यांनी दिल्लीत तबलीग जमातीत गेलेले कोल्हापुरातील २१ बांधव कोल्हापुरात आल्याने कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग वाढला अशा आशयाच्या बातम्या दिल्या आहेत.यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आजरेकर यानी स्पष्ट केले.
फोन वरून त्यांच्याशी चर्चा झाली आहे .ते म्हणाले,” तबलीग जमातीसाठी जाणारे मुस्लिम बांधव धर्मप्रसार करत नाहीत, तर धर्माचे आचरण काटेकोर पणे कसे करावे, हे शिकण्यासाठी तबलीग जमातीत जातात.आतापर्यंत हजारो लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे कार्य तबलीगच्या माध्यमातून घडले आहे. तीन दिवस,आठ दिवस, दहा, पंधरा ,तीस,चाळीस दिवस, चार महीने अशा कालावधीसाठी ही जमात असते .दीर्घकालावधीसाठी जी जमात दिल्ली मरकज मध्ये जाते , ती मरकज मुस्लिम बाँधवांची देशातील शिखर संस्था आहे. या मरकज प्रमुख मौलाना साद यांच्याशी हस्तांदोलन करून मुस्लिम बांधव आपापल्या गावी परत जातात.या मरकजमध्ये दररोज1500 मुस्लिम बांधव येतात.अशाच पद्धतिने कोल्हापुरातील २१ मुस्लिम बांधव तबलीगसाठी दिल्लीला गेले आहेत.पण त्यांचा परतीचा प्रवास सुरु होन्यापूर्वीच देशात लॉक डाऊनची घोषणा झाली .यावेळी दिल्ली मरकज मध्ये सुमारे 1500 मुस्लिम बांधव होते .कोरोना संसर्गाच्या भीतीने या सर्वाना एकत्र ठेवणे ही धोकादायक होते,आणि लॉक डाऊन मुळे हे लोक आपापल्या गावी परत जाणे ही शक्य नव्हते.यासंदर्भात दिल्ली मरकज मुफ्तीनी दिल्ली सरकार आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करून तोडगा काढला .त्यानुसार दिल्ली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने या सर्व तबलीगी बांधवांची आरोग्य तपासणी करून दिल्लीपासुन ४० किलोमीटर अंतरावर एका बहुमंजली अपार्टमेंटमध्ये एका खोलीत फक्त दोघे अशा पद्धतीने सर्वाना कवारण्टाईन केले आहे.त्याना सरकार तर्फे जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे .यामध्येच कोल्हापुरच्या २१ तबलीगी बाँधवांचा ही समावेश आहे.यापैकी कोणीही कोरोनाग्रस्त नाही. लॉक डाऊनची मुदत संपल्यानंतरच हे लोक कोल्हापुरात आणले जाणार आहेत.त्यानंतर कोल्हापुरात पुन्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा त्याना चौदा दिवस क्वारण्टाइन करून मगच घरी सोडले जाणार आहे.कुणीही याबाबत गैसमज करून घेऊ नये. समाज स्वास्थ्य लक्षात घेऊन कोल्हापुरातील मुस्लिम बाँधवानीच पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मसजिद नमाज पठनासाठी बंद केल्या आहेत.१७ आणि १८ एप्रिल रोजी गगनबावडा येथे आयोजित इज्तेमा रदद् केला.जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी मुस्लिम बांधव नेहमीच सहकार्याची भूमिका घेत आले आहेत.या पार्श्वभूमीवर माध्यमानीही वस्तुस्थिती जाणून घेऊन वस्तुनिष्ठ वृत्तांकन करावे असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यानी यावेळी केले.
Leave a Reply