
कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कागलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने आयोजित या शिबिरात सोशल डिस्टन्स इन 111 जणांनी रक्तदान केले. आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाच्या परवानगीने कागल नगरपालिका, आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते. याबाबत अधिक माहिती अशी येथील राजर्षी शाहू संस्कृती सभागृहात या शिबिराचे आयोजन केले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, रमेश माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळभर, माजी उपनगराध्यक्ष आनंदराव पसारे, पंडित मुख्याधिकारी पंडितराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रक्तदानासाठी इच्छुक असलेल्या तीनशेहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांचे नावे व मोबाईल नंबर घेऊन त्यांना परत जाण्याची विनंती संयोजकांनी केली. आरोग्य विभागाच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने त्यांना बोलावून रक्तदान केले जाणार आहे.
Leave a Reply