
कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील डॉक्टरना पीपीई किट देण्यात येणार आहेत.पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली आहे. कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवत लोकांना सर्व जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी ते प्रयत्न करत आहेत.लोकांनीसुद्धा जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक घटकांबरोबर डॉक्टर,नर्स आणि सर्व स्टाफ हे देवदूताप्रमाणे काम करत आहेत. शासनातर्फे शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरना पीपीई किट दिले आहे.पण खाजगी डॉक्टरांकडे ही किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग होण्याच्या कारणामुळे अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टरांना सेवा देणे शक्य झालेले नाही. रुग्णांना सेवा द्यायची इच्छा असूनसुदधा ते आपले काम पूर्ण ताकदीने करू शकत नाहीत.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.कोरोनाच्या संकटात लोकांना आरोग्यसेवा मिळणे आणि डॉक्टरना सुद्धा कोणताही त्रास होऊ नये, या गोष्टी महत्वाच्या आहेत.याचा विचार करून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित् कोल्हापूर दक्षिण मधील डॉक्टरना हे किट देण्यात येणार आहे, असे आ.पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply