
कागल:कोरोना व्हायरसमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांसमोर रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार कागल शहर येथील झोपडपट्टी, वड्डवाडी वसाहत , गोसावीवाडी वसाहत, कोष्टी गल्ली व अनंत रोटो येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व कागल नगरीचे उपनगराध्यक्ष सतीश घाडगे (वड्ड) यांच्या वतीने गरजू ६०० कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू मध्ये तांदूळ, तेल, पोहे, चहा पावडर, साबण, डाळ, पीठ वस्तू देण्यात आल्या. यावेळी मा.हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, नगरसेवक प्रवीण काळबर, माजी नगरसेवक सुनील माळी, कागल शहराध्यक्ष संजय चितारी,शिवाजी जाधव राजू शानेदिवान, दिनेश गोंधळी, सागर कासोटे, रणजित चव्हाण, पंडित कुलकर्णी तसेच भागातील प्रमुख कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते
Leave a Reply