आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून व्हाईट आर्मी संस्थेला सॅनिटायझर चेंबर,पीपीई किट प्रदान

 

कोल्हापूर:आमदार ऋतुराज पाटील यांनी व्हाईट आर्मी संस्थेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर चेंबरची सुविधा उपलब्ध करून दिली .तसेच व्हाईट आर्मीच्या जवानांना पीपीई किट देण्यात आले.त्याचबरोबर 400 किलो तांदुळही देण्यात आले.
देशभरातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तसेच संकटात व्हाईट आर्मी ही संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असते.पुराच्या काळात व्हाईट आर्मीच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचविले.कोरोनाच्या भीषण परिस्थितीत अनेक परप्रांतीय कामगार, ट्रक ड्रायव्हर , तसेच ठि ठिकाणी माळरानावर झोपड्या मारून राहिलेले कामगार आणि हातावर पोट असणारे लोक यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. गेल्या 19 दिवसात 51 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था या संस्थेने केली आहे.
या कामासाठी या संस्थेचे जवान दिवरात्र कार्यरत आहेत.हे काम करताना त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या गोष्टी ध्यानात घेऊन आ.ऋतुराज पाटील यांनी व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार आ.पाटील यांनी मंगळवार पेठेतील एनसीसी भवनच्या पिछाडीस असलेल्या व्हाईट आर्मीच्या कम्युनिटी किचन केंद्राजवळ सॅनिटायझर चेंबर बसवून दिले.जवानांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी पीपीई किट दिली.तसेच लॉकडाउन वाढल्यानंतरही जोमाने काम करणारया या संस्थेला 400 किलो तांदूळ दिले.यावेळी अशोक रोकडे यांनी सांगितले की , पालकमंत्री सतेज पाटील यांना सतत आम्हाला पाठबळ दिले आहे. आ. ऋतुराज पाटील यांनी आमच्या सुरक्षिततेचा विचार केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!