
कोल्हापूर : शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतकार्य सुरु आहे. कोरोनोच्या संकटकाळात अनेक घटकांबरोबर मजूर, कर्मचारी वर्ग अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करीत आहे. कोल्हापूर शहरातील अशा १७ ठिकाणच्या गरजू लोकांना दुपारच्या भोजनाचे वाटप शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतत पालन करून सोशल डीस्टन्स ठेवून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आज देवकर पानंद चौक येथून या सामाजिक उपक्रमास शुभारंभ करण्यात आला. यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शहरातील सुमारे १७ ठिकाणी गरजूंना पाच हजार फूड पॅकेटचे वाटप केले. यामध्ये शहरातील कसबा बावडा येथील आंबेडकर नगर, भगतसिंग वसाहत, सदर बझार, विचारेमाळ, बापट कॅम्प, सोनझारी वसाहत, शहाजी गंज, कनाननगर, कपूर वसाहत, सिद्धार्थनगर, ब्रम्हपुरी, लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल परिसर, वारेवसाहत, मातंग वसाहत, माळी कॉलनी, गंजीमाळ, शहाजी वसाहत आदी भागातील लोकांसह शहरातील भाजीपाला, फळविक्रेते आणि परप्रांतीय बांधकाम मजुरांनाही या एकूण ५००० फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, विशाल देवकुळे, सुनील जाधव, अजित गायकवाड, सुनील खोत, जयदीप मोहिते, विश्वजित मोहिते, भीमराव बिरंजे, रविंद्र माने, सुनील भोसले, निलेश गायकवाड, वसंत पाटील, विनय वाणी, सुशील भांदिगरे, निलेश हंकारे, अविनाश कामते, राहुल माळी, रोहित आळवेकर, तन्वीर बेपारी, राजू ढाले, राहुल चव्हाण, सचिन लाड, कपिल नाळे, सचिन क्षीरसागर, विष्णुपंत पोवार, शाम जाधव, श्रीकांत पाटील, शैलेश बाचणीकर, अक्षय खोत, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, उदय पोतदार, संतोष रेवणकर, संजय बावडेकर, सचिन राउत, सौरभ हारुगले, इंद्रजीत सावेकर, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply