
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोरोना हे थेट मानवी जातीवरचे संकट असले तरी या मधून भारत देशच जगाला दिशा देईल , पण त्या साठी कमालीचा संयम आणि त्याग व लवचिकता यांची नितांत गरज असे मत ज्येष्ठ डाँ.संजीव मुजुमदार यांनी व्यक्त केले. कोल्हापूर प्रेस क्लब आणि कोल्हापूर जिल्हा होमिओपँथिक असोशियशन आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. प्रांरभी सगळ्याचे स्वागत अध्यक्ष मोहन मेस्री यांनी तर प्रास्तविक शिबीर समन्वयक राजेंद्र मकोटे यांनी केले. यावेळी समुपदेशन करताना डाँ.संदीप पाटील यांनी कोरोना हे एक जागतिक मंथन ठरले आहे , या संदर्भात येणारे बदल स्विकारणे अपरिहार्य असणार आहे, असे नमूद केले .
यावेळी बोलताना डॉ. श्रीकांत लडगे यांनी कोणत्याही आजारामागे असणारी मानसिक आणि बौद्धिक ताण तणावाची पार्श्वभूमी अभ्यासणे गरजेचे असून त्या आणि कोरोनाच्या संदर्भानी आगामी काळात समुपदेशन गरजेचे असल्याचे सांगितले. या तिघांसह डॉ . श्याम पावसे , डॉ .सुधिर पाटील ,डॉ. पी.एन.शिंदे,डॉ . विरधवल मोरे , डॉ .नितीन मगदम, डॉ. तेजराज पाटील यांनी १२७ पत्रकारांशी व्यक्तिगत संवाद साधत त्याच्यावर आरोग्य उपचार करत होमिओपथीक औषधे दिली .
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे निखिल अग्रवाल, लिना बावडेकर , रोटरी क्लब ऑफ करवीरचे सचिव शितल दुगे यांनी पत्रकारांसाठी मास्क आणि औषधे विजय केसरकर – विश्वास कोरे यांच्याकडे प्रदान केली. शेवटी आभार डॅनियल काळे यांनी मानले.
या शिबीरात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, डेंटिस्ट असोसिएशनचे डॉ. राजेंद्र भस्मे, सदाशिव जाधव,शीतल धनवडे,संदिप राजगोळकर, विकास पाटील, श्रद्धा जोगळेकर,शुभांगी तावरे,सीमा पवार,सलीम सोलापूरे,अक्षय थोरवत,विजय कुंभार,रविंद्र कुलकर्णी,राजेश मोरे,नंदिनी नरेवडी यांच्यासह विविध वृत्तपत्रे,वृत्तवाहिन्या यांचे पत्रकार,प्रतिनिधी सहभागी झाले होते .
Leave a Reply