
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. अनेक प्रभागामध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांच्या मार्फत औषध फवारणी करण्यात आली. आज भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत वॉर्ड अध्यक्षांमार्फत मास्क व सॅनिटायजर चे वितरण करण्यात आले. अद्यापही काही लोक तोंडाला रुमाल, ओढणी, कापड बांधून फिरताना दिसत आहेत परंतु रुमाल, ओढणी हे मास्क इतके उपयोगी ठरत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने कोल्हापूरातील जनतेच्या सुरक्षतेसाठी हा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या मार्फत राबवण्यात येत आहे. हे मास्क व सॅनिटायजर कोल्हापुरातील ८१ वॉर्ड मध्ये पोहचवण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे.यावेळी कोल्हापूरातील ८१ वॉर्ड मध्ये जास्ती जास्त लोकांपर्यंत मास्क पोचवण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले
Leave a Reply