सलमान खानकडून आ.ऋतुराज पाटील यांच्या कामाचे ट्विटरद्वारे कौतुक 

 

कोोोल्हापूर: आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघातील खाजगी डॉक्टर, आयसोलेशन हॉस्पिटल कम्युनिटी क्लिनिक मधील डॉक्टर, 108 ऍम्ब्युलन्स डॉक्टर आणि ड्रायव्हर्स, व्हाईट आर्मी जवान यांना स्वखर्चाने 1 हजार पीपीई किट दिली.
अभिनेता सलमान खान याने या अभिनव उपक्रमाची दखल घेत ट्विटरद्वारे आ.पाटील यांचे कौतुक केले आहे.
या ट्विटला उत्तर देताना ऋतुराज पाटील यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल सलमान खान यांचे आभार मानले आहे.बीइंग ह्यूमनच्या माध्यमातून आपण करत असलेले काम पथदर्शी आहे.कोरोनाच्या संकटात मी शक्य त्या मार्गाने लोकांना मदत करत आहे.लवकरच कोरोनाचे संकट दूर होईल असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!