
कागल: हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून बेघर वसाहत, घरकुल आरक्षण क्रमांक ३३ व नवीन घरकुल येथील गरजू व कष्टकरी कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. सुमारे १०२२ कुटुंबीयांना मदत करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोनाच्या संकटाबरोबर आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन ही मदत करण्यात आली.कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया बाबा माने, मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स ठेवून धान्याचे वाटप झाले. याप्रसंगी नगरसेवक आनंदाराव पसारे, प्रवीण काळबर, नूतन गाडेकर, साऊथ कास्टिंगचे एच्.आर.ऑफिसर देशपांडे साहेब, प्रशांत पोवार, संतोष रजपूत, भिकाजी देवकर, कुशाल कानडे, प्रवीण सोनुले, इम्तियाज नंदगावे, प्रवीण जाधव, सागर दावणे, संतोष रामणकट्टी, मोहसिन मुल्लाणी, बच्चू घाडगे, राहुल गाडेकर, जमीर सय्यद, बच्चन कांबळे, युवराज माळी, प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply