शिवसेनेकडून मदत कार्याचा ओघ सुरूच

 

कोल्हापूर : कोरोनो विषाणूमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नष्ट करण्यासाठी आर्थिक परीस्थित बिकट असूनही देशहितासाठी कायद्याचे पालन करत घरीच राहणाऱ्या गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. शहरातील कोणीही गरजू, गोरगरीब कुटुंब मदतीपासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या या मदत कार्याच्या पाचव्या टप्प्याचा आज प्रारंभ करण्यात आला.
गेले महिनाभरापासून शहरात सुमारे १० हजार फुट पॅकेट आणि २ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले आहे. या चार टप्प्यामध्ये गोरगरीब कुटुंब, रिक्षाव्यावसायिक, फेरीवाले, कलाकार, पत्रकार बंधू- भगिनी यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. तर गोरगरीब नागरिक, परप्रांतीय मजूर यांच्याबरोबर २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाचे वाटप करण्यात आले आहे.आजच्या या पाचव्या टप्प्यामध्ये शहरातील सुमारे ७५ हजार कुटुंबाना पाच प्रकारच्या मोफत भाजीपाला वितरणाची सुरवात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते, देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर यांनी, कोरोनाच्या संकटकाळात रोजचे हातावरचे पोट असणारे गोरगरीब गरजू फेरीवाले, रिक्षाव्यावसायिक, बांधकाम मजूर आदिना या लॉकडाऊन स्थितीची झळ बसत आहे. या गरजू नागरिकांना शिवसेना सातत्याने मदत करत करीत आहे. पुढील काळात शहरातील असा कोणताही गरजू व्यक्ती जिवनावश्यक वस्तूपासून वंचित राहणार नाही, याची काळजी शिवसेना घेईल. येणाऱ्या काही दिवसात अनेक टप्प्यात अन्नधान्याची मदत गरजू नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम शिवसेना करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, जयवंत हारुगले, नागेश घोरपडे, इंद्रजीत आडगुळे, उदय भोसले, धनाजी दळवी, दीपक चव्हाण, रणजीत जाधव, सुनील खोत, अजित गायकवाड, सुनील जाधव, रमेश पोवार, विष्णुपंत पोवार, विक्रम पवार, सुनील भोसले, निलेश गायकवाड, सुनील खेडकर, सुभाष पाटील, किरण पाटील, सचिन ढनाल, संदीप ढनाल, धनाजी कारंडे, निलेश हंकारे, सुशील भांदिगरे, सुरेश कदम, सनी अतिग्रे, दीपक घाटगे, अनंत पाटील, शिवतेज सावंत, राहुल घाटगे, रवी जाधव, कमलाकर साळवी, सम्राट यादव, लतीफ गारदी, अमेय भालकर, मनोज हावळ, जयवंत सोनुले, सुनील सावर्डेकर, सचिन क्षीरसागर, सुशांत महाडिक, महावीर पोवार, राज कापसे, कपिल नाळे, अर्जुन आंबी, संदीप राणे, अनिल काटकर, राजू निकम आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!