
संपूर्ण देशच लॉकडाऊन असल्यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर ज्या वेब सिरीज आणि जे सिनेमे उपलब्ध आहेत ते आपण सर्वजण पाहत आहोत. आणि आता यामध्ये मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्यामुळे प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे.‘अमिताभ बच्चन मराठी सिनेमात झळकणार’ पासून “चंदू मी आलोय” हा त्यांचा डायलॉग या दरम्यान त्यांच्या ‘एबी आणि सीडी’ सिनेमाची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली. बिग बी आणि विक्रम गोखले यांची फार जुनी मैत्री आहे हे कळल्यावर अनेकांची सिनेमाविषयीची उत्सुकता वाढली होती पण कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे प्रेक्षक आणि सिनेमा यांची गाठभेट झाली नाही. परंतू आता लवकरच त्यांची भेट होणार आहे आणि ते ही आपल्या घरात.महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मिलिंद लेले दिग्दर्शित आणि हेमंत एदलाबादकर लिखित ‘एबी आणि सीडी’ सिनेमाचा प्रिमिअर अॅमेझॉन प्राईमवर आयोजित करण्यात आला आहे. कोविड १९च्या वॉरिअर्सला समर्पित करुन हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय अशी घोषणा सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी केली.
Leave a Reply