
कोल्हापूर : कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे शिकार सारे देश होत आहेत. यातच प्रत्येक घरात लोक रोजगाराविना आर्थिक संकटात सापडलेले असताना अनेक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात नागरिक मुंबई पासून आपल्या गावी पाई चालत जात आहेत. रोजगार नाही आणि खायला अन्न आणि पैसे नाहीत. याची संग्ख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
असे असताना देखील कोल्हापुरात मात्र आपण खाऊ आणि शक्य तितक्या लोकांनाही खाऊ घालू या भावनेतून सर्व लोक जमेल तशी मदत करत आहेत. कोणत्याही संकटावेळी कोल्हापूर मदतीसाठी कधीच मागे पडले नाही. मग आताच्या कोरोना आजराच्या वेळी तरी कसा मागे पडेल ना? अनेक लोकांनी जमेल तसे मदत केली आहेच त्यातीलच एक भाग म्हणून कोल्हापूर मधील व्हाईट आर्मी कडून ४१ दिवसात आतापर्यंत साधारण ३ लाख लोकांना अन्नछत्र रूपाने मदत केली आहे. याबदल त्यांना आमच्या टीम कडून मनाचा मुजरा…
Leave a Reply