
कोल्हापूर’:सध्या सर्व जग कोरोना संक्रमणाच्या संकटामधून वाटचाल करत आहे. हा धोका प्रत्येकाच्या दारावर येऊन उभा ठाकला आहे. याला सध्यातरी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रतिबंध. म्हणूनच सध्याच्या काळात एकूणच हायजेनिक प्रॉडक्टस् ना मार्केटमध्ये प्रचंड आणि वाढती मागणी आहे. कोल्हापूर मधील महिला उद्योजकांनी एकत्र येऊन, कोल्हापूर मध्येच उत्पादित होणाऱ्या दर्जेदार पर्सनल केअर, होम केअर तसेच इन्स्टिट्यूशनल केअर इत्यादी प्रॉडक्टस् चे आपल्या स्वतःच्या ‘SAS हायजीन्स सोल्युशन्स’ या ब्रँडखाली एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीची सुरुवात केली. त्याचे लाँचिंग कोल्हापूरचे युवा आमदार श्री ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झूम या डिजिटल प्लॅटफॉर्म वरून अतिशय उत्साहात करण्यात आले. विशेष म्हणजे या कन्स्पेटमध्ये वेगवेगळ्या तीन कंपन्यांनी “एकमेका सहाय्य करू” या तत्वानुसार एकत्रित येऊन कामाला सुरवात केलेली आहे. वीशबॉन, सास हायजीन्स सोल्युशन्स आणि विप्रासइंडिया याच त्या तीन कंपन्या ज्या कोल्हापूर स्थित आहेत आणि ज्या आता एकत्रित येऊन काम करत आहेत. यामध्ये वीशबॉन ही गेल्या ८ वर्षांपासून कोल्हापूरमध्ये गोकुळ शिरगाव येथे पर्सनल केअर, होम केअर तसेच इन्स्टिट्यूशनल केअर इत्यादी प्रोडक्टस् चे उत्पादन करणारी कंपनी आहे, तर SAS ही कोल्हापूर मधीलच सौ अमृता बिचकर, सौ शिल्पा माने, आणि सौ साक्षी बिचकर या तीन युवा व धडाडीच्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेली कंपनी असून त्यांनी कोल्हापूर मधील तरुण अभियंत्यांनी बनवलेली श्री प्रमोद सुर्यवंशी यांच्या विप्रासइंडिया या ई-कॉमर्स वेबसाईट सोबत टाय-अप केलेले आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना याच ई-कॉमर्स साईटवरून कंपनीचे सर्व प्रॉडक्टस् घरपोच मिळणार आहेत. या ऑनलाइन लाँचिंग सोहळ्याला कंपनीच्या महिला डायरेक्टर्स सह, वीशबॉनचे श्री विशाल माने, कृष्णा केमिकल्सचे श्री जगदीश भानुशाली, श्री विजय बिचकर, श्री अभय बिचकर, श्री प्रमोद सुर्यवंशी, श्री राहुल तोरो तसेच पत्रकार आदी ६० जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदेश कोडोलीकर यांनी केले. लवकरच हे सर्व प्रॉडक्टस् संपूर्ण देशात वितरित करण्याचा कंपनीच्या संचालकांचा मानस आहे.
Leave a Reply