
कागल:एरवी उठ -सूट राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसदार म्हणून दाखला देणारे, शाहू महाराजांचा अपमान झाल्यावर गप्प का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अनादराने उल्लेख करून अवमान केलेल्या या गंभीर चुकीचे प्रायश्चित माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहूं महाराजांच्या जन्मभूमीत म्हणजेच कोल्हापुरात येऊन माफी मागून भोगावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अनादर केल्याचा आरोप, कागल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. त्याबद्दल पक्षाच्यावतीने श्री.फडणवीस यांचा तीव्र शब्दात निवेदनाव्दारे निषेध व्यक्त केला आहे. या प्रकाराबद्दल श्री फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत येऊन माफी मागण्याची कागल राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने निवेदनाच्या वेळी प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, नविद मुश्रीफ, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजय चितारी, प्रवीण काळबर, आनंदा पसारे, बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, रमेश माळी, संग्राम लाड, गंगाधर शेवडे, रविंद्र मर्दाने, संजय चितारी, माधवी मोरबाळे आदी उपस्थित होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी झाली. त्याअनुषंगाने अभिवादन करण्यासाठी श्री.फडणवीस यांनी टाकलेल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक “कार्यकर्ते” असा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना शब्दाची किंमत कळते, त्यामुळे त्यांना कशा पद्धतीने बोलायचे ते चांगलेच कळते, त्यांनी हेतुपुरस्कर केले किंवा चुकून केले यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तीबद्दल असे होणे निषेधार्थ आहे. खऱ्याअर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कळलेच नाहीत, अशी टीकाही या निवेदनात केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समतेचे आणि लोक कल्याणकारी असे महान ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख “कार्यकर्ते” असा एकेरी होणे हा आम्हा विचाराचे वारसदार असलेल्या कागलच्या जनतेचा अवमान आहे पण याहून मोठे दुर्दैव म्हणजे जे आम्ही रक्ताचे वारसदार आहोत असे म्हणनवून घेणारे त्यांच्याकडून एक हि शब्द याबाबत काढला गेला नाही. यातून दिसून येते की राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारस कोण आहेत.
एरवी सातत्याने सतत लाईव्ह बोलतात. लोकांशी संपर्क साधतात आणि शाहू महाराजांच्या अनादर केल्यानंतर एक वाक्यही काढत नाहीत. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कागल ही शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. या राजर्षी शाहूंच्या भूमीतून तीव्र भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत, अशी ही निवेदनात म्हटले आहे.माजी मुख्यमंत्री व विद्यमानब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या जन्मभूमी घेऊन जनतेची माफी मागावी अशीही या निषेध निवेदन पत्रकाद्वारे म्हटले आहे.
Leave a Reply