
कोल्हापूर: केंद्र व महाराष्ट्र शासनाने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना कार्यालये सुरु करण्यासाठी काही अटीवर तत्वतः मान्यता दिली आहे.त्यास अनुसरून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सर्व कार्यालये शनिवार दि.९ मे २०२० पासून सुरू करण्यात येत आहेत .कृपया सर्व सभासद, हितचिंतक, कलाप्रेमी यांनी नोंद घ्यावी व संस्थेस सहकार्य करावे ही विनंती.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करणेसाठी आपण सर्वजण सर्वोतोपरी दक्षता घेत आहात. तरी सुद्धा खालील सूचनांचे पालन करून कोरोना विषाणू मुक्त करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करूया. त्याप्रमाणे आपणही महामंडळास सहकार्य कराल ही अपेक्षा.
१) कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी हाताला सॅनिटायझर व मास्क लावणेत यावे. तसेच दोघा मधील अंतर किमान एक मीटर ठेवावे.
२) महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कार्यालयात गर्दी करू नये.
३) कार्यालयात प्रवेश करणेपूर्वी आपण आपले नाव ,मोबाईल नंबर, पत्ता, कामाचे स्वरूप या गोष्टीची नोंद रजिस्टरवर करूनच प्रवेश करावा.
४) कार्यालयात कामाशिवाय जास्त वेळ थांबू नये.
५)सोशल डिस्टिसिंगचे तंतोतंत पालन करणेत यावे.
६)सभासदांनी शक्यतो परस्पर दूरध्वनी/मोबाईलवरून आपल्या कामाची चौकशी करून आवश्यकता असेल तरच प्रत्यक्ष कार्यालयात येण्याचे नियोजन करावे. म्हणजे आपला आणि कार्यालयाचा वेळ व श्रम वाचतील.
७) एकाच वेळी दोन व्यक्ती शिवाय अधिक सभासदांना कार्यालयात परवानगी देण्यात येणार नाही.
८) महामंडळ सभासदांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे.
९) महाराष्ट्र शासनाच्या नियमाचे व अटीचे पालन करणेत यावे.
१०) आपल्या कार्यालयाची सभ्यता,शुचिता आणि शिस्त सांभाळण्यास सर्वांनी सहाय्यभूत व्हावे.
Leave a Reply