
कोल्हापूर:गेले दोन- तीन दिवस सीपीआर हॉस्पिटल मधील डीप फ्रीज खरेदीवरून प्रसारमाध्यमांमधून बातम्या आलेल्या आहेत. त्या वाचून मी फारच व्यथित, अस्वस्थ झालेलो होतो. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. श्रीमती मीनाक्षी गजभिये यांच्याशी चर्चा केली. कोरोना संसर्गाशी दोन हात करून संघर्ष करून कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये कसा जाईल याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत. अशा विषयांची चर्चा होणं हे बरोबर नाही.या परिस्थितीत मी डॉ. श्रीमती गजभिये यांना सांगितले आहे की, तुमचाही प्रामाणिकपणा तुम्हाला सिद्ध करावा लागेल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्हीही तसे पत्र द्या. यापुढे अशा पद्धतीचे वाद होऊ नयेत. अशा पद्धतीच्या बातम्या येऊन डॉक्टर्स, पॅरा – मेडिकल स्टाफ नाऊमेद होतात. तसेच आमच्यासारखे काम करणारे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारीही नाऊमेद होत असतात. ते लोक नाउमेद होऊ नयेत, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, अशा पद्धतीच्या अपेक्षाही डॉ. श्रीमती गजभिये यांच्याकडून व्यक्त केलेल्या आहेत.असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
Leave a Reply