
कोल्हापूर :पश्चिम महाराष्ट्रातील सेवाकार्यात एक आदर्श होत असलेल्या सावली केअर सेंटर मध्ये आगामी काळात लागणारे वैद्यकीय मदत सेवा पुरवण्यासाठी तत्पर असल्याचे श्री दत्त समर्थ क्लिनिक चे डॉक्टर प्रमोद रामचंद्र घाडगे यांनी सांगितले. करवीर तालुक्यातील पिराचीवाडी येथील सावली केआर सेंटरच्या मुखालयात असलेल्या सर्व कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना आयुष मंत्रालयाने सुचित केलेले कोरूना पार्श्वभूमीवरील प्रतिबंधक गोळ्यांची दोनशे पाकिटे प्रदान करण्यात आली. सलग तीन दिवस दिवसातून दोनवेळा हस्तस्पर्श न करता या गोळ्या घेण्याची सुचना देत सावलीचे ऊर्मिला भांगरे – अमीर सय्यद यांचे कडे हे कीट प्रदान करण्यात आले . यावेळी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अँडाव्होकेट रणजितसिंह घाटगे यांनी “” संपूर्ण जग कोरोना मुक्ती संदर्भाने भारताकडे आशावादीपणे पाहत आहे .त्यामुळे आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या संचारबंदीसह वेळोवेळीच्या सूचनांचे पालन करून एक नागरिक एक जबाबदार म्हणून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे आग्रहाने नमुद करत , विश्व हिंदू परिषदेच्या सेवाकार्याचा एक भाग म्हणून आगामी काळात सावलीला लागणारी मदत देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे अभिवचन त्यांनी दिले. प्रारंभी सावली तर्फे संस्थापक किशोर देशपांडे यांनी शिवाजी पेठ नाळे कॉलनी ते पिराचीवाडी या गेल्या पंधरा वर्षाच्या प्रवासाचा धावता आढावा घेतला तसेच नव्याने सुरू झालेल्या क्रीडाविषयक उपक्रमाची हे माहिती दिली सर्वांचे स्वागत समन्वयिका सीमा राजेंद्र मकोटे यांनी केले तर आभार पिरवाडी चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश राठोड यांनी मानले. यावेळी या वैद्यकीय मदती बद्दल सावली वतीने मानसी देशपांडे , दौलत कांबळे आणि यांच्या हस्ते डॉक्टर प्रमोद घाडगे , अँड.रणजितसिंह घाडगे तसेच मातृशक्तीच्य सुनेत्रादेवी घाटगे यांचा शाल- स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आगामी काळात सावलीत समावेत विविध सेवाभावी संस्था आणि कार्यकर्ते यांचा समन्वय वाढवण्यासाठी निर्धार सर्वांनी व्यक्त केला..
Leave a Reply