
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (जीपीए ) अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील
कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील वैद्यकीय व्यवसायामध्ये व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन जीपीए कोल्हापूरच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.सचिवपदी डॉ अरुण धुमाळे आणि खजानिसपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड करण्यात आलेली आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या तर्फे सीपीआर येथे ओपीडी व स्क्रीनिंग सुरू आहे. आयुष तर्फे जिल्हा प्रशासनाच्या मदतीला हाताला हात देऊन संघटनेतील डॉक्टर मदत करत आहेत.आयसोलेशन येथे सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी क्लिनिक मध्येही संघटनेतील डॉक्टरांचा सहभाग आहे.
प्रशासनाला सहकार्य व मदतीसाठी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही संघटना नेहमीच तत्पर असते. संघटनेतील सर्व सदस्यांनी आपापल्या प्रभागातील दवाखाने अत्यावश्यक सेवेसह सर्वत्र खुले आहेत.नूतन कार्यकारिणीमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ विनोद घोडगे, पदसिद्ध अध्यक्ष डॉ. शुभांगी पार्टे, अध्यक्षीय सल्लागार प्रमुख डॉ. विलास महाजन, सल्लागार चेअरमन डॉ उद्यम व्होरा, सल्लागार सदस्य डॉ शिवपुत्र हिरेमठ, डॉ शिवराज देसाई,कार्यकारिणी सदस्य डॉ विनायक शिंदे, डॉ वीरेंद्र कानडीकर, डॉ राजेश सातपुते,डॉ. उषा निंबाळकर, डॉ.वर्षा पाटील डॉ शीतल पाटील, डॉ पी.पी.शहा, डॉ. रमेश जाधव, डॉ. दीपक पवार डॉ. शिवराज जितकर. डॉ. अजित कदम डॉ. सचिन मुतालीक डॉ. राजेश कागले आदींचा समावेश आहे.
Leave a Reply