डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित

 

कोल्हापूर: येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी लॅब आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लॅबची आज पाहणी केली. 
जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून यापूर्वीच शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.आज कदमवाडीतील डॉ. डी. वाय.पाटील या खासगी रुग्णालयात सुरु झालेल्या कोव्हिड-19 तपासणी लॅबची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुल सचिव संजय जाधव, डॉ. आर.एस.पाटील, डॉ. रोमा चौगुले, व्ही.एस.व्हटकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील आणि जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.त्याच बरोबर स्वॅब कलेक्शन केंद्राची त्यांनी पाहणी केली. आरटीपीसीआर तंत्रज्ञानाची लॅब कार्यान्वित केली आहे. या लॅबमध्ये दिवसाला 400 नमुने तपासण्याची क्षमता असून सोमवारी आर.एन.आय एक्स्याक्युटर हे मशीन येणार आहे. त्यानंतर या लॅबची क्षमता दुप्पट होणार आहे, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!