
कोल्हापूर:राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर असोशियन कडून 5000 फेस शिल्डचे वाटप झाले. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या सुरक्षेसाठी हे शील्ड देण्यात आले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.यावेळी बोलताना मंत्री श्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोना संसर्गाशी सुरू असलेल्या युद्धात ग्रामीण पातळीवर अगदी गल्लीबोळात आणि वाड्या-वस्त्यांवर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर या भगिनी रणरागिनी बनून लढताहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून हे योगदान देत आहोत. आमचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि डॉक्टर सेलचे राज्य अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या परिश्रमातून हे सामाजिक काम सुरू आहे.यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, आमदार राजेश पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . अमन मित्तल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, सरचिटणीस अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
Leave a Reply