
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याबाबत आज डॉ.एस.एच.जोशी व आजरेकर फौंडेशन यांनी प्रभाग क्र.26 कॉमर्स कॉलेज या त्यांच्या प्रभागातील नागरीकांना होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप महापौर सौ.निलोफर आजरेकर यांच्या हस्ते केले.
सध्या जगामध्ये पसरत असलेल्या कोरोनोच्या विषानुच्या कठिन काळात नागरीकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरीबध्दल दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. एस.एच.जोशी व आजरेकर फौंडेशन यांच्यावतीने हि औषधे मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या औषधामुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास तसेच कोनत्याही आजारापासून संरक्षणास या औषधाचा उपयोग होणार आहे. यावेळी आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर, अश्कीन आजरेकर, वर्षा मोरे,विकी पांडत,अक्षय बुजुगडे,शौकत बागवान,अभिजित सुरवंशी,साईद तांबोळी,समीर बागवान,सारुक शेख रोहन कांबळे निलेश भोसले सारफराज जमादार अर्जुन मोरे
व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply