
कोल्हापूर : कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात आहे.लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत.आपल्या देशात राज्यात सुद्धा कोरोनाचा अद्याप तांडव सुरूच आहे.आता आपल्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना युध्दात जिया परवेज खतीब हिने उडी घेतली आहे.कोरोना युद्धात सहभागी होण्याच्या ईर्षेने प्रयत्नशिल असलेल्या शाहूपूरी येथील कु.जीया परवेज खतीब या जिद्दी मुलीची कोल्हापूरच्या सीपीआर मार्फत शेंडापार्क येथे कार्यरत कोविड-19 च्या स्वॅब तपासणी प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली,जिया ने पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषयातील एमएससी असून त्या संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a Reply