आ. चंद्रकांत जाधव यांच्यावतीने होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास सुरवात

 

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने शहरातील सर्व कुटुंबांना मोफत होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज सुरवात झाली.कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्याचे गेल्या आठवड्यात आमदार जाधव यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नियोजन होऊन प्रत्येक घरोघरी औषध देण्याचा व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उपक्रमाची सुरवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कनाननगर येथे झाली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सभागृह नेता दिलीप पोवार, डॉ. सत्यजित जाधव, डॉ. दश्मिता जाधव, डॉ. शीतल पाटील, डॉ. श्रीकांत लंगडे यांच्यासह होमिओपॅथिक संघटनेचे सर्व डॉक्टर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी आमदार जाधव म्हणाले, कोणताही दुष्पपरिणाम न होणाऱ्या व रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या गोळ्या सकाळी काहीही न खाता रोज चार याप्रमाणे तीन दिवस घ्यावयाच्या आहेत. पाच लोकांच्या कुटुंबासाठी एक बॉटल या प्रमाणात याचे वाटप होमिओपॅथिक डॉक्टर, महापालिका, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून शहरातील सर्व कुटुंबांना करणार आहोतऔषध घेण्याबाबत डॉ. सत्यजित जाधव यांनी सांगितले की, रोज सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या. याप्रमाणे सलग तीन दिवस घेणे. बॉटलच्या झाकणातच चार गोळ्या टाकणे व जीभेवर टाकून चघळणे. हाच डोस परत एक महिन्याने घेणे. तीन वर्षापर्यंतच्या मुलाला दोन गोळ्या द्याव्यात. याचबरोबर कोणाला इतर कोणत्या आजाराची औषधे चालू असतील तरीही हे औषध घेतले तरी चालू शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!