कोरोनाकाळात सकारात्मक राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या:प्रतिमाताई पाटील

 

कोल्हापूर:कोरोनाच्या या काळात आपण सकारात्मक राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी महिला नगरसेविकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले.सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील आणि महापौर निलोफर आजरेकर यांनी आज महिला नगरसेविकांची व्हिडीओ कॉन्फरसन घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भागातील आढावा घेतला. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महिला आणि बाल कल्याण समिती सभापती शोभा कवाळे, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेविका जयश्री चव्हाण, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, पूजा नाईकनवरे, सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी, दीपा मगदूम, वृषाली कदम, वनिता देठे, रीना कांबळे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी या नगरसेविकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले. या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीत महिला याच प्रथम कोरोना योद्धा आहेत. महिला या कुटुंबाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतात. त्यामुळे महिलांनी या काळामध्ये सकारात्मक राहणे महत्वाचे आहे. स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घ्यावी, आपल्याला व्यवहार करायला परवानगी दिली याचा अर्थ कोरोनाचा प्रादुर्भाव संपला असे नाही. तर दक्ष राहून काळजी घेतली पाहिजे. मुंबई, पुण्यासह बाहेरून कोल्हापूरात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वॅब घेतला जातो त्यामुळे कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नका. रोजच्या रोज ध्यान, योगा करा नियमित व्यायाम यावर भर द्या. सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करा. नागरिकांनाही सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करायला लावा. या कोरोनाच्या परिस्थितीत सर्व महिला नगरसेविकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील यांनी केलं. तर महापौर निलोफर आजरेकर यांनी शहरातील नागरिकांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून होमिओपॅथीक औषधे दिली जात आहेत. ज्यांच्यामध्ये कोरोनाच्या लक्षणे आहेत त्यांनी तात्काळ तपासणी करून घेतली आहे.
ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील त्यांनी दक्षता म्हणून होम क्वारंटाईन झालेले उपयुक्त आहे. सर्व महिला नगरसेविकांनी काळजी घ्यावी, भागात लक्ष ठेवावे, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे पालन करा. प्रभाग समितीही समन्वय ठेवून योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!