माणुसकी हाच शिवसेनेचा धर्म : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : सध्या करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबाची उपासमार होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री, प्रशासन, आरोग्य सेवक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत या संकटावर मात करण्याची जबाबदारी सर्वांची असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक भान जपत अनेक सामाजिक उपक्रम होत आहेत. माणुसकीचे दर्शन घडविणारा असाच सामाजिक उपक्रम आज कोल्हापुरात पार पडला. यंदाची ईद साजरी न करता गोरगरीब रिक्षाव्यावसायिक १५ कुटुंबाना धान्यवाटप आणि गरजू संस्थेला सुमारे ४० हजारांची औषधांची मदत शिवसेना अंगीकृत रिक्षा चालक सेनेचे उपशहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे व कुटुंबियांतर्फे करण्यात आली. माणुसकी हाच शिवसेनेचा धर्म असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. यंदाची ईद न करता गोरगरीब कुटुंबियांची मदत करण्याचा निर्णय नाकाडे कुटुंबीयांनी घेतला. नाकाडे स्वत: रिक्षा व्यावसायिक असल्याने लॉकडाऊन काळात रिक्षा व्यावसायिकांना बसलेली झळ त्यांनी स्वत: अनुभवली आहे. त्यामुळे यंदाची ईद साजरी न करता आपल्या व्यावसायिक बंधूंच्या कुटुंबियांना मदत करीत एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला. शिवसैनिक म्हणून अल्लाउद्दिन नाकाडे यांनी घेतलेल्या निर्णयाचा व केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.शिवसेना अंगीकृत रिक्षा चालक सेनेचे उपशहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे व कुटुंबियांतर्फे १५ गोरगरीब रिक्षाव्यावसायिकाना तांदूळ आणि गहू धान्य स्वरुपात मदत करण्यात आली. यासह स्व.डॉ.दिनकरराव साळोखे फौंडेशन, कोल्हापूर या सेवाभावी संस्थेस सुमारे ४० हजार रुपयांच्या औषधांची मदत करण्यात आली.
यावेळी रिक्षा चालक सेनेचे उपशहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, उपजिल्हाप्रमुख विष्णुपंत पवार, उपशहरप्रमुख विक्रम पवार, उपशहरप्रमुख सुनील खेडकर, रमेश पोवार, सुभाष पाटील, शशिकांत शेट्टी, बिंदू चौक रिक्षा मित्र मंडळचे अध्यक्ष राजू जमादार, दीपक कोकणे, इर्शाद अकीवाटे, निसार बारस्कर, मुस्ताक शेख आदी रिक्षा चालक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!