
मुंबई: भारत सरकारने केलेल्या नियुक्तीनंतर श्री जी. आर. चिंताला यांनी २७ मे २०२० रोजी नाबार्डच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नाबार्डचे अध्यक्ष होण्याआधी श्री. चिंताला बेंगलुरु येथील ‘नैवफिन्स’ चे व्यवस्थापकीय संचालक होते.श्री. चिंताला भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, नवी दिल्लीचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. नाबार्ड मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नाबार्डच्या मुंबई मुख्य कार्यालयात आणि हैदराबाद, लखनऊ, चंडीगड, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, नवी दिल्ली आणि बेंगलुरु येथील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. श्री चिंतालाऍग्री बिज़नस फ़ाइनेस लि. हैदरावादचे दोन वर्ष उपाध्यक्ष होते आणि बँकर्स ग्रामीण विकास संस्था (बर्ड), लखनऊचे निदेशक होते.श्री. चिंताला यांनी विविध सल्लागार समनुपदेशन संबंधित कार्यदेखील केले आहे. ज्यात “स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना (एसजीएसवाय) मध्ये अनुसूचित जाति/जमातीच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावोत्पादकता” हा विषय प्रमुख होता. याच्या शिफारशींमुळे संपूर्ण देशात एसजीएसवायच्या जागी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (एनआरएलएम) सुरू करण्यासाठी मदत झाली.श्री. चिंताला यांनी नाबार्डमधील त्यांच्या सेवेच्या दरम्यान अंदमान और निकोबार द्वीप समूहातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या खोबरे -नारळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी योग्य व लाभदायक दर निश्चित करण्यासाठी तिथे शेतकरी उत्पादक संघटनेचा शुभारंभ केला.श्री चिंताला यांनी वीसपेक्षा अधिक देशात ज्यामध्ये बोलिविया, ब्राज़ील, केन्या, सेनेगल, इंडोनेशिया आणि संयुक्त राज्य अमेरिका, चीन, यूरोपियन देश प्रामुख्याने आहेत. आपले शोधनिबंध प्रस्तुत केले आहेत व समनुपदेशनाचे कार्य करण्यासाठी प्रवास केला आहे..श्री चिंताला यांनी विभिन्न क्षेत्रात केलेले कार्य व त्यांच्या समृद्ध अनुभवाचा नाबार्डला कृषि आणि ग्रामीण विकासाच्या संदर्भात अधिक फायदा होईल. विशेषकरून वर्तमान कोविड -19 महामारीच्या आव्हानाच्या काळात त्यांच्या अनुभवाचा उपयोग
Leave a Reply