
कागल : देवदासीना तुम्ही सुरू केलेली पेन्शन आणि कोरोणाच्या संकटकाळात तुम्ही देत असलेले हे धान्यच आमच्या जगण्याचा आधार आहे, अशी आर्त आणि व्याकुळ कृतज्ञता समस्त देवदाशी भगिनीनी व्यक्त केली . देवदासींच्या या जगण्याच्या व्याकुळतेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही काही क्षण गलबलून गेले . कृतज्ञतेच्या या भावनेमुळे सहाजिकच त्यांचे डोळेही पाणावले .सकाळी नऊ- साडेनऊची ही वेळ होती . ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कागलमध्ये निवासस्थानासमोरील मंडपात बसले होते. लॉकडाऊनमुळे अतिमहत्त्वाची कामे घेऊन आलेले अवघे आठ-दहा कार्यकर्ते पाच-दहा फुटाच्या अंतरावर विखरून बसलेले होते. श्री. मुश्रीफ त्यांच्या समस्या, गाऱ्हाणी ऐकण्यात आणि ती सोडविण्यात मग्न होते.एवढ्यात दहा ते बारा देवदाशी धान्य नेण्यासाठी एकत्र मिळून आल्या. त्यांच्या या आर्त आणि व्याकुळ कृतज्ञतेमुळे सारे वातावरण भावनिक झाले
Leave a Reply