
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार, ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर ‘हिंदु धर्मजागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसारासाठी आज सकाळी १० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानापासून ‘भव्य वाहन काढण्यात आली. फेरीच्या प्रारंभी फेरीतील भगव्या धर्मध्वजाचे पूजन बांधकाम व्यावसायिक भैय्या शेटके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुरोहित आण्णी गेरी यांनी मंत्रपठण केले. या फेरीत १२५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. या वाहनफेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिस्तबद्ध पद्धतीने ही फेरी काढण्यात आली. फेरी काढतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फेरी चालू असतांना ध्वनीक्षेपकावर उद्घोषणा करून सर्वांना ४ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या फेरीत शिवसेनेच्या नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, भीमराव पाटील, नंदकिशोर आहिर, उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे कमलाकर किलकिले, शिवाजीराव ससे, हिंदुस्थान नागरी एकता संघटनेचे संजय वसे, धर्माभिमानी उत्तम कांबळे, काका पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, राजन बुणगे, सनातन संस्थेच्या डॉ. सौ. शिल्पा कोठावळे, सौ. संगीता कडूकर, सौ. विजया वेसणेकर यांसह आदी मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाहन फेरीत सहभागी झाले.
ही वाहनफेरी शहरातील शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, आझाद चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर,महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मी रोड, फोर्ड कॉर्नर, उमा चित्रपटगृह, आझाद चौक या मार्गाने पुन्हा राजारामपुरी येथे सभेच्या ठिकाणी फेरीची कोपरा सभा घेऊन सांगता झाली. सर्व वाहनांवर भगव ध्वज लावण्यात आले होते. फेरीतील सर्वांनी भगव्या टोप्या आणि फेटे घातले होते. या वेळी ‘हर हर महादेव, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम’ अशा घोषणा धर्माभिमान्यांनी देऊन धर्माभिमान्यांनी सर्व परिसर दणाणून सोडला. राजारामपुरीतील पाचवी गल्ली, मिरजकर तिकटी आणि महाद्वार रोड येथे सौ. संगीता टिपुगडे, सौ. प्रतिभा घाटगे आणि श्री. अमर काकडे यांनी फुले वाहून धर्मध्वजाचे पूजन करून वाहन फेरीचे स्वागत केले.
Leave a Reply