
कोल्हापूर : महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येत आहे. आज महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण 22 अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व 22 अर्ज लोकशाही दिनाच्या कार्यकक्षेत घेण्यात आलेले आहेत. या अर्जापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधीत 16 अर्ज, नगररचना विभागाशी संबधीत 2 अर्ज, आरोग्य, घरफाळा, परवाना व इस्टेट विभागाशी संबधीत प्रत्येक 1 अर्ज आहेत. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचना आयुक्त पी.शिवशंकर यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
या लोकशाही दिनामध्ये प्रामुख्याने विनापरवाना बांधकाम, अतिक्रमण काढणे, विनापरवाना व्यवसाय या विषयी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या लोकशाही दिनास अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त शीला पाटील व महापालिकेचे संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply