
कोल्हापूर : तपस्या सिद्धी कला अकादमीच्या वतीने नृत्यचंद्रीका संयोगिता पाटील हिने लावणी मानवंदना हा विश्वविक्रम आज केला.शिवाजी स्टेडीयम वर ठीक साडे सात वाजता विश्वविक्रमास सुरुवात झाली.आणि १२.४६ मिनिटात एक मुजरा आणि १० लावणी सादर करून याची नोंद गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लंडनहून आलेले जॅक ब्रोक बँग आणि निरीक्षक मुकुंद कुळे यांनी संपूर्ण तपासणी करून याची अधिकृत घोषणा केली.५७३ मुलींनी यात सहभाग दर्शविला.कोल्हापूरला यामुळे दुसऱ्यांदा विश्वविक्रमाचा मान मिळाला आहे.
यावेळी लावणी नृत्यांगणा मंगला साखरे,राजश्री नगरकर,रेश्मा मुसळे,यांचा विशेष सन्मान आणि गुलाबबाई संगमनेरकर यांना २१ हजार रोख आणि मानचिन्ह देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक,पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले.महाराष्ट्राची लोक परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा यासाठीच हा प्रयत्न आहे असे विश्वविक्रमाची नोंद झाल्यावर संयोगिता पाटील हिने सांगितले.कार्यक्रमासाठी शोभा पाटील,अरुंधती महाडिक.मुंबई लोककला विभाग प्रमुख डॉ.प्रकाश खांडगे यांच्यासह मान्यवर,पालक आणि कोल्हापूरकर उपस्थित होते.
Leave a Reply