कोरगांवकर ट्रस्टतर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर सीसी टीव्ही कॅमेरे,सोमवारी उदघाटन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते शिवाय अन्य नागरिकही ये जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कोरगांवकर पेट्रोल पंप व कोरगावकर ट्रस्ट यांच्यामार्फत पुणे बेंगलोर हायवे वर तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या नव्या उपक्रमाचे उदघाटन सोमवारी 8 जून रोजी सकाळी 11.30 वाजता करवीरचे डी.वाय. एस. पी श्री अमृतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे अधिकारी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!