
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत राजारामपूरी व शाहूपूरी परीसर याठिकाणी विना परवाना सुरु असलेल्या 1)ओम गॉगल अण्ड कॅप्स 2)ऐार्या कॉस्मॅटिक, 3)मोक्ष फॅशन गॅलरी, हि दुकाने आज सिलबंद करणेत आले. तसेच थकबाकीदारांकडून रु.86225/- वसुल करणेत आले.
सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिक्षक सचिन जाधव, लिपीक संभाजी कांबळे, अमर यादव, भगवान मांजरे, अनिल आदीवाल व कर्मचारी शकील पठाण व लियाकत बास्कर यांनी केली.
ज्या व्यवसायधारकांनी आपले व्यवसाय परवाने नुतनीकरण केलेले नाहीत तसेच थकबाकी भरलेली नाही अशा सर्व व्यवसायधारकांनी आपले परवाने तात्काळ नुतनीकरण करुन घ्यावेत अन्यथा मु.प्रां.म.न.पा.अधि.1949 वे कमल 386 व विनियमातील नियम नं 45 नुसार सिलबंदची कारवाई करणेत येईल याची सर्व व्यवसायधारकांनी नोंद घ्यावी असे महापालिकेच्या परवाना विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
Leave a Reply