तथाचार्य भूमिकेमुळे अभिनयातील ‘नवरस’ साकारण्‍याची संधी :पंकज बेरी

 

अत्‍यंत प्रतिभावान दिग्‍गज अभिनेता पंकज बेरी सोनी सबवरील मालिका ‘तेनाली रामा’मधील तथाचार्यच्‍या भूमिकेसाठी अत्‍यंत लोकप्रिय आहे. अभिनेत्‍याने त्‍याच्‍या अद्वितीय अभिनयासह अनेकांची मने जिंकली आहेत. मालिका ‘तेनाली रामा’ने पंडित राम कृष्‍णा आणि त्‍याचा प्रतिस्‍पर्शी तथाचार्यसोबतच्‍या विलक्षण कथांसह लाखो प्रेक्षकांच्‍या मनावर छाप पाडली आहे.
गेल्‍या दोन महिन्‍यांपासून नियमाचे पालन करणा-या पंकज बेरीला सेटवरील रेलचेलची आठवण येत आहे. विशेषत: त्‍याला त्‍याची भूमिका तथाचार्यच्‍या रूपाची ओढ लागली आहे. ”मला ‘तेनाली रामा’च्‍या सेटवरील धावपळीची खूप आठवण येत आहे. सध्‍या मी कामापासून दूर घरीच आहे. यादरम्‍यान मला जाणवले की मी स्‍वत: भाग्‍यवान आहे, कारण मला तथाचार्यसारखी सर्वोत्तम भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली. या भूमिकेसाठी आमचे चाहते व प्रेक्षकांनी दिलेले प्रेम व पाठिंब्‍यामुळे मला अधिक उत्‍साह मिळत आहे. या भूमिकेमध्‍ये अभिनयाचे सर्व नवरस सामावलेले आहेत. या ९ भावना सादर करण्‍याची कलाकारासाठी ही अपूर्व संधी आहे. दीर्घकाळापासून त्‍यांच्‍या घरापासून दूर असलेल्‍या लोकांसाठी हा अत्‍यंत खडतर काळ आहे. आशावादी राहणे महत्त्वाचे आहे. मनामध्‍ये नकारात्‍मक विचार येणार नाहीत, याची मी काळजी घेतो.”हा काळ अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे, पण मी लोकांना सक्षम राहण्‍याचे आणि त्‍यांचे कुटुंब व प्रियजनांसोबत वेळ व्‍यतित करण्‍याचे आवाहन करतो. लवकरच या संकटामधून बाहेर पडू. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि आनंदी राहा.” पाहा पंकज बेरीला तथाचार्यच्‍या भूमिकेत ‘तेनाली रामा’मध्‍ये फक्‍त सोनी सबवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!