
कोल्हापूर : सध्या जगभरात करोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून केंद्र शासन व राज्य शासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना करत आहेत.त्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सारखे निर्णय घेतले नागरिकांनी आपल्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी सर्व व्यवहार बंद करून घरातून कोणीही बाहेर न पडता शासनाच्या अव्हानाला प्रतिसाद देत आहेत.मात्र सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांचे उपासमार होत आहे त्याच बरोबर डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, प्रसार माध्यम प्रतिनिधी पत्रकार यांनी मात्र स्वतःची जबाबदारी म्हणून शासन प्रशासनास मदत करीत आहेत.पण आत्ताच्या लॉकडाऊन काळात पत्रकारांचे आर्थिक गणित कोलमडले असून जाहिरात प्रतिनिधी, मानधन व कमीशन बेसिस वर काम करणारे पत्रकार, यांचे आर्थिक दृष्टिकोणातून खूपच हाल होत आहेत.शिवाय घर भाडे, ऑफिस भाडे, विज बिल, मुलांचे शिक्षण साहित्य, मुलांचे शाळा ये जा करण्यासाठी रिक्षा मामाचे भाडे, अशा अनेक गोष्टीच्या संकटाला पुढे सामोरे जायचं आहे.या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन
युवा पत्रकार संघाने आपल्याकडील असणाऱ्या सभासदांसाठी मदत म्हणून,भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांना प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे जीवनावश्यक वस्तूंची मागणी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष यांनी ताबडतोब याची दखल घेऊन भाजपचे प्रसिध्दी प्रमुख शंतनु मोहिते.यांना माहिती घेण्यास सांगून तात्काळ किमान एक महिना पुरेल असे दैनंदिन आवश्यक असणारी जीवनावश्यक वस्तू देण्याचे ठरवले.आपल्या स्वतःच्या घरी ऑफिस वर बोलवून सोशल डिस्टन्सचे नियम पाळून स्वतः उपस्थित राहून आपल्या हस्ते जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप केले.
सर्व युवा पत्रकार संघातील पत्रकार सभासदांनी घरी गेल्यावर फोन वरून अशा कठीण काळामध्ये कोल्हापूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आणि युवा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य मदतीसाठी धावून आल्या बद्दल कौतुक व कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी
कोल्हापूर महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचे आभार मानले.यावेळी राज्य उपाध्यक्ष:-सुशांत पोवार,
प. म.अध्यक्ष नवाब शेख ,सौ.कोमल शिंगे ,राज्य संघटक,डी. एस. कोंडेकर,सौ ऐश्वर्या पोवार,राज्य खाजनिस बाबुराव वळवडे,
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जावेद देवडी, गायत्री माजगावकर,जिल्हा सचिव शरद माळी,जेष्ठ पत्रकार अरुण शिंदे,रविराज कोल्हटकर,
कमलाकर सारंग, मुबारक अत्तार,दत्ता देवणे, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी,
नारायण सुतार,दिनेश चोरगे,समीर मकानदार,रितेश पाटील,प्रियांका राऊत,सतीश चव्हाण,गणेश वाईकर,नितीन ढाले,नियाज जमादार,
शौकत नायकवडी आदी उपस्थित होते.
Leave a Reply