
बंगळुरू :बदलत्या गरजा व ग्राहकांच्या अपेक्षांवर आधारित उत्तम ग्राहक अनुभव देण्याच्या प्रयत्नात, टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) सुविधा आणि सहजतेसाठी दोन नवीन सेवा देऊ करण्याची घोषणा केली आहे- फ्लेक्सिबल ईएमआय पर्याय आणि टोयोटा ऑफिशिअल (अधिकृत) व्हॉट्सअॅप.
नवीन घोषित,फ्लेक्सिबल ईएमआय पर्यायाचा उद्देश ग्राहकांना त्यांची कार खरेदीची आकांक्षा साकार करण्यात आणि कारची देखभाल चालू ठेवण्यास मदत करणे आहे.याव्यतिरिक्त,नवीन ‘टोयोटा ऑफिशियल व्हॉट्सअॅप’ग्राहकांशी अखंड संवाद करण्यास सक्षम राहील .नवीनतम देयक परवाना अंतर्गत, ग्राहक टोयोटा वाहन घेऊ शकतात किंवा पेमेंटला ३/६ /९ / महिन्यांच्या ईएमआयमध्ये रुपांतरित करण्यासाठी पर्यायांसह सेवा घेऊ शकतात. ही देय योजना कमी व्याज आणि काही बाबतींत १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफी यासारख्या आकर्षक फायद्यासह आहे
टोयोटा ऑफिशियल व्हॉट्सअॅप सेवा नव्याने लाँच करण्यात आली आहे. आता ग्राहक आणि सर्वसामान्यांना कोणत्याही चौकशीसाठी किंवा फीडबॅकसाठी ८३६७६८३६७६ वर एक मिस कॉल किंवा एसएमएसद्वारे ‘हाय’ पाठवून टोयोटाशी संपर्क साधता येईल.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांना नवीन माहिती मिळून कारची खरेदी, विक्री /एक्सचेंज ,सर्व्हिस अपॉइंटमेंटचे बुकिंग ,ब्रेकडाउन सेवांसाठी विनंती किंवा सेवांसाठी फीडबॅक देता येईल.विशेष मूल्यवर्धित उपक्रमांबद्दल भाष्य करताना,टोयोटा किर्लोस्कर मोटर,सेल्स अँड सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.नवीन सोनी म्हणाले,“आम्ही या कठीण काळात आमच्या सर्व ग्राहकांच्या सहकार्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. एक ब्रँड जो ग्राहकांना प्रत्येक व्यवहाराचे केंद्रस्थानी ठेवतो, त्यांच्याकरिता आमच्याकडे विशेष सोयीस्कर उपक्रम आहेत जे वाहनांच्या मालकीची प्रक्रिया सुलभ करतील. आमच्या नवीन ईएमआय योजना आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम खरेदी आणि सर्व्हिसिंगचा अनुभव सुनिश्चित करून सोयीस्कर देय पर्याय प्रदान करतील. वापरण्यास सुलभतेमुळे आमच्या सर्वांनी संवादाचे सर्वात पसंतीचे एक ‘ऑफिशिअल व्हॉट्सअॅप चॅनल सुरू करण्याची घोषणा करण्यात आम्हालाही आनंद झाला आहे, जो अखंड आणि सर्वस्व ग्राहकांचा अनुभव देईल”.
Leave a Reply