
कोल्हापूूूूूूर:’ भावी पिढीला सक्षम करणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करावे, पालकांना विश्वासात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे याबाबत सर्वच संस्थाचालकांना सूचना द्याव्यात असे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष, शाळा, विद्यार्थी, पालक व शैक्षणिक गुणवत्ता या अनुषगांने शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्याशी आमदार जाधव यांनी आज चर्चा केली.आमदार जाधव म्हणाले, कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाबद्दल विविध प्रकारे चर्चा सुरू आहे; मात्र जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा सर्वाधिक जबाबदारी शिक्षकांवर राहणार आहे. शाळेत शिक्षकांनी पालकांची भूमिका बजावली पाहिजे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी सुरक्षित आहेत, याचा विश्वास पालकांना देण्याची जबाबदारी शिक्षकांची असणार आहे. या अनुषगांने उपसंचालक कार्यालयातून सर्व शिक्षक व शिक्षण संस्थांना सूचना दिल्या जाव्यात.विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच मूल्याधिष्ठित, व्यावसायिक, जीवनोपयोगी शिक्षण देण्यासाठी शालेय स्तरावर सर्व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत.
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि कोरोनामुळे अध्यापन क्षेत्रात झालेल्या बदलासाठी शिक्षकांना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करावे, अशा सूचना आमदार जाधव यांनी केली.शालेय पोषण आहार व मोफत गणवेश योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी, तसेच विविध विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्ती परीक्षा याबाबतही शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी यावेळी केले
Leave a Reply